गुजरातच्या निवडणुकांमुळे ‘पद्मावती’ रोखला; पहलाज निहलानींचा गंभीर आरोप

pahlaj nihlani on Padmavati support

टीम महाराष्ट्र देशा: पद्मावती प्रदर्शित होण्यापूर्वीच लोकांनी विरोध सुरु केला. तसेच या चित्रपटाला सातत्याने डावलले गेले. सेन्सॉर बोर्डाची ही भूमिका त्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. या सगळ्या गोष्टीत व्होटबँकेचे राजकारण करण्यात आल असल्याचा आरोप सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांनी केला आहे. तसेच माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या दबावात गुजरातच्या निवडणुकांमुळे चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्यात आल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.

सुरुवातीपासूनच वादाचा विषय ठरलेल्या पद्मावती सिनेमाच्या अडचणी अखेर संपल्याच दिसत आहे. काही अटींसह सेन्सॉर बोर्डाने सिनेमाला हिरवा सिंगल दाखवला आहे. २८ डिसेंबरला एका कमिटीकडून सिनेमाचा रिव्हू घेण्यात आला होता. त्यानंतर आता काही बदल सुचवत यूए सर्टिफिकेट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान चित्रपटात सुचवण्यात आलेल्या कटमुळे निर्मात्यांचे प्रचंड नुकसान होणार असल्याचा दावाही निहलानी यांनी केला.