fbpx

CBFC- पहलाज निहलानी यांची होणार हकालपट्टी

सेंसर बोर्डचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांची त्यांच्या पदावरून लवकरच उचलबांगडी होण्याची शक्यता आहे. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, तसे संकेत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने निहलानी यांना दिले आहेत.निहलानी यांच्या जागेवर निर्माते प्रकाश झा किंवा टिव्ही प्रोड्यूसर आणि कलाकार चंद्रप्रकाश द्विवेदी यांची निवड केली जाऊ शकते. इतकेच नाहीतर दिग्दर्शक-निर्माते मधुर भांडारकर हे सुद्धा या यादीत असल्याची चर्चा आहे.

‘लिपस्टीक अंडर माय बुर्खा’ या सिनेमामुळे पहलाज निहलानी हे जास्त वादात सापडले. त्यांच्या विरोधात बॉलिवूडही एकत्र आले. त्यांच्या विनाकारणच्या विरोधांना कलाकार कंटाळले होते. शाहरूख खानच्या आगामी ‘जब हॅरी मेट सेजल’ या सिनेमातील ‘इंटरकोर्स’ शब्दावर त्यांनी आक्षेप घेतला होता. तो शब्द पास करण्यासाठी त्यांनी अनेक अटीही घातल्या होत्या. यामुळे सिने इंडस्ट्रीतील अनेक निर्माते, दिग्दर्शक, लेखक, कलाकार हे त्यांच्या विरोधात गेले आहेत.

 Please Subscribe Our YouTube Channel