कोल्हापुरात भन्साळीच्या ‘पद्मावती’ सिनेमाचा सेट जाळला

पुन्हा एकदा संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावती या सिनेमाला टार्गेट केलं आहे. कोल्हापुरात दिग्दर्शक संजय लिला भन्साळी यांच्या ‘पद्मावती’ चित्रपटाचा सेट जाळण्याचा प्रयत्न झाला. पद्मावतीचं शुटिंग जयपूरमध्ये होत होतं तेव्हा देखील सेटवर तोडफोड केली असून मारहाणीचा प्रकार झाला.

padmavati-1padmavati-3

राजस्थानच्या करणी सेना नावाच्या एका संस्थेने संजय लीला भन्साळी यांना मारहाण करत या सिनेमाला विरोध केला. कारण राणी पद्मावतीवर हा सिनेमा तयार केला जात आहे. या समुहाचा आरोप असा आहे की, भन्साळी यांच्या सिनेमात राणी पद्मावतीला अतिशय चुकीच्या पद्धतीने लोकांसमोर आणत आहेत. मात्र भन्साळी यांनी विरोध केला आहे. त्यानंतर मागील काही दिवसांपासून कोल्हापूरच्या मसाई पठारावर ‘पद्मावती’ सिनेमाचं शूटिंग सुरु आहे.

padmavati

पण, या चित्रपटामागचं शुक्लकाष्ट थेट पन्हाळगडाच्या पायथ्याशीही कायम असल्याचं या घटनेवरुन समोर आलं आहे. दरम्यान, जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरु केला आहे. पद्मावती सिनेमात दीपिका पादूकोण, शाहिद कपूर आणि रणवीर सिंह प्रमुख भूमिकेत आहेत. १७ नोव्हेंबर २०१७  रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. सिनेमात दीपिका राणी पद्मावती तर रणवीर सिंह अल्लाउद्दीन खिलजीच्या भूमिकेत आहेत.

padmavati-2

You might also like
Comments
Loading...