भन्साळींच्या पद्मावती प्रदर्शनासाठी राजपूत समाज संघटनेकडून निषेध

पुणे:-  राजपूत समाज संघटना पिंपरी चिंचवड शहर शाखेच्या वतीने पुणे जिल्ह्यात पद्मावती चित्रपटाचे एकही पोस्टर अथवा चित्रपट प्रदर्शित न करण्यासाठी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांना रविवार (२९ ऑक्टोबर) रोजी निवेदन देऊन चर्चा करण्यात येणार आहे, अशी माहिती राजपूत महामोर्चा पिंपरी चिंचवड शहर प्रमुख नीता परदेशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित आगामी चित्रपट पद्मावतीच्या प्रदर्शनासाठी राजपूत समाज संघटनेच्या वतीने विरोध दर्शविण्यात येत आहे. राजपूत समाजाच्या शिष्टमंडळाने राज्य सरकारच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली असून सरकारी शिष्टमंडळाने राजपूत समाजाला चित्रपट दाखविल्याशिवाय महाराष्ट्रात प्रदर्शित करणार नसल्याचे लेखी आश्वासन दिले आहे.

You might also like
Comments
Loading...