…तर ‘पद्मावती’ महाराष्ट्र देखील प्रदर्शित होऊ देणार नाही

पद्मावती

टीम महाराष्ट्र देशा – ‘पद्मावती’ या चित्रपटात जर राणी पद्मावती यांच्याविषयी काही आक्षेपार्ह असेल तर हा सिनेमा मुंबई, महाराष्ट्रात शिवसेना प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशारा शिवसेना नेते संजय राऊत त्यांनी दिला. संजय राऊत यांच्या उपस्थितीत रविवारी धुळे, शिंदखेडा येथे, तर सोमवारी नाशिक जिह्यातील येवला, दिंडोरीत पदाधिकारी व लोकप्रतिनिधींच्या विधानसभानिहाय आढावा बैठका पार पडल्या, त्याप्रसंगी ते बोलत होते.

निवडणुका या फक्त पैशांवरच जिंकता येतात, हा गैरसमज आहे, तो दूर करा. सामान्य शिवसैनिकांनी बलाढय़ विरोधकांना धूळ चारल्याची उदाहरणे आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद आणि शिवसैनिकांचे मोठे पाठबळ शिवसेनेच्या पाठीशी असल्याने आगामी निवडणुकीत आपला विजय निश्चित असल्याचा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला