‘पद्मावत’ रिलीज होणारच; कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी राज्यांची : सुप्रीम कोर्ट

टीम महाराष्ट्र देशा : ‘पद्मावत’ चित्रपटाला व दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा दिलासा दिला आहे. सिनेमावर बंदी आणण्यासाठी मध्य प्रदेश आणि राजस्थान सरकारने जी याचिका दाखल केली होती, ती याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे.

सिनेमा रिलीज झाला तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असं या दोन्ही राज्यांनी म्हटलं होतं. मात्र कायदा आणि सुव्यवस्था राखणं ही राज्य सरकारची जबाबदारी आहे, असं म्हणत कोर्टाने मध्य प्रदेश आणि राजस्थान सरकारची याचिका फेटाळली.

तुम्ही जर काही संघटनांच्या धमक्या आणि हिंसेचा हवाला देत असाल तर त्यावर आम्ही सुनावणी का करायची. एका घटनात्मक संस्थेने सिनेमाला परवानगी दिलेली आहे, कोर्टानेही रिलीज करण्याचे आदेश दिले आहेत. तरी तुम्ही पुन्हा कोर्टाकडे येता. कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी राज्यांची आहे, असे खडेबोलही कोर्टाने राज्य सरकारला सुनावले.

सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयानंतरही सिनेमा रिलीज झाल्यास कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल म्हणत राजस्थान आणि मध्य प्रदेश सरकारने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. सुप्रीम कोर्टाने यावेळी दोन्ही राज्यांना खडेबोल सुनावत याचिका फेटाळून लावली.

You might also like
Comments
Loading...