‘पद्मावत’ सोबत रिलीज होणार पॅडमॅन तर अय्यारी चित्रपटाने घेतला धसका

ayyari padmavati padman

टीम महाराष्ट्र देशा : २६ जानेवारीला पॅडमॅन, अय्यारी आणि ‘पद्मावत’ असे तीन चित्रपट प्रदर्शित होणार होते.  पण अय्यारी चित्रपटाच्या टीमने आता पद्मावतचा धसका घेत चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली आहे.

Padmavat gets a release date, set to clash with Akshay Kumar’s PadMan on January 25पद्मावत ( पद्मावती ) चित्रपट केव्हा प्रदर्शित होणार याची सगळ्यांनाच उत्सुकता लागलेली होती. हा चित्रपट आता २६ जानेवारीला प्रदर्शित होणार असून पॅडमॅन आणि पद्मावती या चित्रपटाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. पद्मावत ( पद्मावती ) चित्रपटाचा अनेक दिवसांपासून चांगलाच वाद सुरू होता. चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आल्यापासूनच या चित्रपटाविषयी प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता आहे. तसेच या चित्रपटातील घुमर… हे गाणे तर प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून अक्षय कुमारने एकही फ्लॉप चित्रपट दिला नाही. त्यामुळे त्याचा पॅडमॅन देखील बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल असे म्हटले जात आहे. पॅडमॅनमध्ये राधिका आपटे आणि सोनम कपूर यांच्या देखील मुख्य भूमिका आहेत.

या दोन चित्रपटांसोबतच अय्यारी हा चित्रपट देखील २६ जानेवारीला प्रदर्शित होणार होता. पण आता या चित्रपटाने पद्मावतीचा धसका घेतला आहे . चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा, मनोज वाजपेयी, नसिरुद्दीन शहा आणि अनुपम खेर यांच्या मुख्य भूमिका आहेत. चित्रपटाचे चित्रीकरण दिल्ली, लंडन, काश्मीर या ठिकाणी झालेले आहे. तसेच या चित्रपटाचे दिग्दर्शन नीरज पांडे करत असून त्याने आजवर वेन्सडे, स्पेशल २६, एम एस धोनी द अन्टोल्ड स्टोरी यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. नऊ फेब्रुवारीला प्रदर्शित करण्याचा निर्णय चित्रपटाच्या टीमने घेतला आहे

aiyyari

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, फाॅलो करा टि्वटर आणि जी प्लसवर