‘पद्मावत’ राजस्थान मध्ये होणार नाही रिलीज, हि आहेत कारणे

टीम महाराष्ट्र देशा :  पद्मावती चित्रपटाचे नाव बदलून ‘पद्मावत’ करण्याच्या बदलासह एकूण पाच बदल करून हा चित्रपट देशभरात 25 जानेवारीला रिलीज करण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. हा चित्रपट राजस्थान वगळता देशबरात 25 जानेवारीला रिलीज केला जाण्याची शक्यता आहे. राजपूत नेते आणि इतर संघटनांचा विरोध पाहता हा चित्रपट रिलीज करणे अत्यंत कठीण असणार आहे.

Loading...

padmavat-film-to-released-on-25th-januaryघूमर डान्समध्ये सुधारणेसह हे आहेत 5 बदल

  1.  नाव पद्मावत असेल.
  2. पात्राच्या लौकिकानुसार घूमर डान्समध्ये सुधारणा होतील.
  3. हा चित्रपट सती प्रथेचे समर्थन करत नाही असे डिस्क्लेमर द्यावे लागेल.
  4. चित्रपट काल्पनिक असल्याचेही डिस्क्लेमर द्यावे लागेल.
  5. ऐतिहासिक स्थळांच्या भ्रामक संदर्भांबाबत बदल केले जातील.

Deepika-Padukone-in-Ghoomar-Song-Padmavatiराजस्थान मध्ये होणार नाही रिलीज, हे आहेत कारणे
चित्रपटाबाबत राजपूत समाजामध्ये प्रचंड नाराजी आहे. चित्रपटाच्या विरोधात आधीही आंदोलने झालेली आहेत. राज्यात 29 जानेवारीला पोटनिवडणूकही आहे. त्यामुळे सरकारला कोणाचीही नाराजी ओढवून घ्यायची नाही. त्यामुळे चित्रपट रिलीज होण्याची शक्यता कमीच आहे. श्री राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष लोकेंद्र सिंह कालवी म्हणाले, चित्रपट रिलीज झाला तर अनेक राज्यांच कर्फ्यू लागेल. राजपूत सभाचे अध्यक्ष गिरिराज सिंह म्हणाले, कोणत्याही परिस्थितीत हा चित्रपट रिलीज होऊ देणार नाही.

 सीएम वसुधंरा राजे यांनी 18 नोव्हेंबरला माहिती व प्रसारण मंत्री स्मृती ईराणी यांना पत्र लिहिले होते. त्यात म्हटले होते की, लॉ अँड ऑर्डर मेंटेन करणे हे सर्वात पहिली गरज आहे. त्यांनी सल्ला दिला होता की, राजपूत समाजांच्या भावना दुखावल्या जाऊ नये याची काळजी घेण्यासाठी चित्रपटाचे समीक्षण करावे.
vasundhara raje on padmavati

चित्रपटामध्ये पाच बदल करण्यात आले आहेत. 28 डिसेंबरला झालेल्या एक्सपर्ट्स रिव्यू कमेटीने हे बदल सुचवले होते. कमिटीमध्ये सहभागी असलेली शाही कुटुंबातील अरविंद सिंह यांनी त्याचवेळी आक्षेप घेतला होता. सेंसॉरने स्वतःच नाव बदलण्यासह इतर बदलांबाबत निर्णय घेतल्याचा आरोप त्यांनी केला होता.
padmavat-film-to-released-on-25th-january
वादाच्या कचाट्यात अडकलेल्या या चित्रपटाच्या नावात आणि गाण्यांमध्ये बदल केल्यानंतर सेन्सॉरकडून प्रदर्शनाला परवानगी देण्यात आली आहे. सेन्सॉर बोडॉकडून शुक्रवारी २ तास ४३ मिनिटांची वेळ असलेल्या पद्मावतला U/A प्रमाणपत्र देण्यात आले.

चित्रपटाचे नाव पद्मावती होते ते पद्मावत असे केले असून चित्रीकरणापासून वादाला सामोरे जावे लागले आहे. कधी सेट जाळण्यात आले तर कधी कलाकरांना धमक्या देण्यात आल्या. हा चित्रपट १ डिसेंबरला रिलीज होणार होता. पण, रजपूत करणी सेना आणि मारवाडी समाजाचा वाढता विरोध लक्षात घेता याचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले होते. अखेर चित्रपट प्रदर्शनाची तारीख निश्चित करण्यात आली आहे.

हा चित्रपट राजस्थान वगळता देशबरात 25 जानेवारीला रिलीज केला जाण्याची शक्यता आहे. राजपूत नेते आणि इतर संघटनांचा विरोध पाहता हा चित्रपट रिलीज करणे अत्यंत कठीण असणार आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, फाॅलो करा टि्वटर आणि जी प्लसवर Loading…


Loading…

Loading...