अक्षय कुमार च्या हाती ‘अभाविप’ चा झेंडा

टीम महाराष्ट्र देशा: अभिनेता अक्षय कुमार याचा ‘पॅडमॅन’ नावाचा चित्रपट रिलीज होत आहे. दरम्यान अक्षय कुमार चित्रपटाच्या प्रसिद्धी साठी दिल्ली विद्यापीठात गेला होता. ‘पॅडमॅन’ हा एक चरित्रात्मक चित्रपट आहे. अरूणाचललम मुरूगगनाथम यांच्या जीवनावर या चित्रपटाची कथा आधारली आहे. या चित्रपटाचे प्रोमो, ट्रेलर्स, पोस्टर सध्या जोरदार चर्चेत आहेत. या चित्रपटात अक्षय कुमार याच्यासोबत राधिका आपटे आणि सोनम कपूरच्याही भूमिका महत्त्वाच्या आहेत.

padman 1

दिल्ली विद्यापीठात महिला मॅरेथॉनला अक्षय कुमारने हजेरी लावली. या मॅरेथॉन च्या फॅल्ग ऑफ साठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा झेंड्याच्या वापर केला.अक्षयने हातामध्ये ‘अभाविप’ चा झेंडा असलेला एक फोटो आपल्या ट्वीटरवरून शेअर केला आहे .अक्षयने शेअर केलेल्या या फोटोची सध्या बरीच चर्चा सुरु आहे.काही दिवसांपूर्वी अक्षय चा चित्रपट ‘पॅडमॅन’ हा करमुक्त करावा अशी मागणी होत होती. त्यावर ‘पॅडमॅन’ ऐवजी सॅनिटरी नॅपकीन्स करमुक्त करा असं अक्षय कुमारने सुचविले होत.

आज दिल्ली विद्यापीठात महिला मॅरेथॉन दरम्यान अक्षय ने पुन्हा एकदा ‘पॅडमॅन’ हा करमुक्त करण्याच्या मागणीवर महत्त्वाची भूमिका मांडली आहे. त्याने ट्वीटर वरून हि माहिती दिली. अभिनेता अक्षय कुमारने म्हटले आहे की, दिल्ली विद्यापीठातील सुंदर मुली महिला शक्तीला समोर घेऊन जात आहेत. सॅनिटरी नॅपकीन्स करमुक्त करा अस अक्षय कुमारने सुचवलं आहे .