पद्मावत विरोध; गुंडांचा स्कूलबसवर भ्याड हल्ला

school bus padmavat

टीम महाराष्ट्र देशा- पद्मावत’ या चित्रपटाला विरोध करणाऱ्या कथित संस्कृती रक्षकांनी(गुंडांनी) बुधवारी गुडगावमध्ये लहान मुले असलेल्या एका शाळेच्या बसवर हल्ला चढवून आपले शौर्य दाखवून दिले. यावेळी शिक्षकांनी आणि मुलांनी बसच्या सीटखाली आसरा घेतल्याने त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. ही बस शाळेच्या आवारातून बाहेर पडल्यानंतर लगेचच एका जमावाने बसवर हल्ला चढवला. जमावाने दगड आणि काठ्यांनी बसच्या खिडकीच्या काचा फोडल्या. यामुळे बसमधील मुले प्रचंड घाबरली होती. मात्र, बसमधील शिक्षकांनी प्रसंगावधान दाखवत सर्व मुलांना सीटच्या खाली लपायला सांगितले. या बसमधील एक विद्यार्थी तर अवघा चार वर्षांचा होता. साहजिकच या हल्ल्यामुळे अनेक मुले घाबरली होती. या घटनेचा व्हिडिओ पाहिल्यास अनेक मुले हा प्रकार सुरू असताना रडत असल्याचे दिसत आहे.

gd-goenka-school-padmaavat-gurgaon-

गुरुग्राममध्ये करणीच्या गुंडांनी अक्षरशः कहर केला. शाळेतून घरी परतणाऱ्या चिमुरड्यांच्या स्कूलबसवर तुफान दगडफेक केली. गुरुग्राममधील जीडी गोयंका वर्ल्ड शाळेतील मुलं बुधवारी संध्याकाळी घरी येत होती. त्यावेळी अचानक करणी सेनेच्या 60 गुंडांनी स्कूलबसचालकाला बस थांबवायला सांगितलं. ड्रायव्हरने दुर्लक्ष करत गाडी सुरुच ठेवल्याने गुंडांनी दगडफेक सुरु केली. बसच्या काचा फुटल्या, मात्र शिक्षकांनी बस पुढेच जाऊ देण्याचं ड्रायव्हरला बजावलं.

या हल्ल्यामुळे भेदरलेली 10 वर्षाच्या आतली मुलं स्कूलबसमधील शिक्षकांच्या मागे लपली. काही चिमुरड्यांना तर घाबरुन रडू फुटलं. दगडाच्या भीतीनं अखेर ही मुलं सीटच्या खालच्या जागेत लपून राहिली.अतिशय संतापजनक असलेली ही दृश्यं व्हायरल झाल्यानंतर देशभरातून करणी सेनेच्या भ्याडपणावर जोरदार टीका होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणी अद्यापही कुणालाही अटक झालेली नाही.

याच मुद्द्यावरून आता कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सरकारवर निशाना साधला आहे.

1 Comment

Click here to post a commentLoading…
Loading...