गलिच्छ व अपशकुनी ‘पद्मावत’ मुसलमानांनी पाहू नये – ओवेसी

टीम महाराष्ट्र देशा- ‘पद्मावत’ सिनेमाचा वाद काही संपताना दिसत नाही कारण राजपूत संघटना ,करणी सेना यांच्यानंतर आता ‘पद्मावत’च्या विरोधकांमध्ये आता एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांची भर पडली आहे. ‘पद्मावत हा एक गलिच्छ व अपशकुनी चित्रपट आहे. मुसलमानांनी तो पाहू नये,’ असं आवाहन त्यांनी केलं आहे. वारंगल येथे एका सभेला संबोधित करताना ओवेसी यांनी हे आवाहन केलं.

काय म्हणाले एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी?

‘पद्मावत हा एक गलिच्छ व अपशकुनी चित्रपट आहे. मुसलमानांनी तो पाहू नये. ‘पद्मावत हा एक फालतू चित्रपट आहे. हा चित्रपट पाहणं म्हणजे वेळ आणि पैशाची नासाडी आहे. त्यामुळं मुसलमानांनी, खासकरून तरुणांनी हा चित्रपट बघू नये. देवानं तुम्हाला हा दोन तासांचा चित्रपट पाहण्यासाठी बनवलेलं नाही. एक चांगलं जीवन जगण्यासाठी तुमचा जन्म आहे. अनेक पिढ्या आठवण काढतील, अशी कामं करण्यासाठी तुमचा जन्म झालाय,’ असंही ओवेसी म्हणाले.

You might also like
Comments
Loading...