लोककला जपणाऱ्या कोकणातील परशुराम गंगावणे यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर !

padma

नवी दिल्ली : उद्या २६ जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिन ! उद्या देशातील ७२ वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जाणार आहे. विविध प्रकारच्या शूर, देशहितासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींसोबतच अनेक क्षेत्रातील दिग्गजांना देशातील महत्वाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. आज प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृहमंत्रालयाकडून पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकर समाजाचे परशुराम गंगावणे यांना कला क्षेत्रातील पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. ही बाब अभिमानास्पद असून त्यांनी लोककलेसाठी घेतलेल्या कष्टांचा हा सन्मान करण्यात आला आहे. कळसूत्री बाहुल्या ही लोककला जपून समाजामध्ये जनजागृती आणि प्रभोदन केल्यामुळे गंगावणे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.

हा पुरास्कार जाहीर झाल्यानंतर परशुराम गंगावणे यांना आनंदाश्रू आवरता आले नाहीत. ही कला जपण्यासाठी अनेकदा रिकाम्या पोटी देखील झोपावं लागलं होतं. अनेक कष्ट घ्यायला लागले त्याचं आज सार्थक झालं, अशी प्रतिक्रिया त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे. दरम्यान, परशुराम गंगावणे यांच्यासह अनाथांची माई अशी ओळख असलेल्या सिंधुताई सपकाळ यांना देखील पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.

तर, जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे, माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन, माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान (मरणोत्तर) यांच्यासह तारलोचन सिंह, रजनीकांत श्रॉफ, कालबे सादिक (मरणोत्तर), केशूभाई पटेल (मरणोत्तर), नृपेंद्र मिश्रा, चंद्रशेखर कांबरा, तरुण गोगई (मरणोत्तर), कृष्णन नायर यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या