सांगली: सरकारच्या आणि पोलिसांच्या विरोधानंतरही अखेर गोपीचंद पडळकर यांनी बैलगाडी शर्यत यशस्वी करून दाखवली. भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि त्यांच्या समर्थकांनी बैलगाडा शर्यत पार पाडली आहे. कोणत्याही परिस्थितीत बैलगाडा शर्यत होणार नाही असा शासनाचा प्रयत्न होता तर काहीही झालं तरी शर्यत पार पडणारच, असा निर्धार पडळकरानी घेतला होता. त्याप्रमाणेच आज सकाळी पहाटे पाच वाजता पडळकर समर्थकांनी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करुन शासन आणि प्रशासनाला दम भरवून दिला आहे.
दरम्यान पडळकर यांच्या फार्म हाऊसच्या बाजूला शर्यतीसाठी ट्रॅक उभारण्यात आला होता. मात्र याची माहिती मिळताच पोलिसांनी ट्रॅक उध्वस्त केला होता. मात्र यानंतरदेखील रात्रीतून तिथूनच पाच किमी अंतरावर दुसरा ट्रॅक बनवण्यात आला. आणि पहाटे पाच वाजता ही स्पर्धा पार पडली.
पोलिसांचा मोठा फौजफाटा असूनही ही स्पर्धा पडळकर समर्थकांनी पार करून दाखवली. मात्र अजूनही आमदार गोपीचंद पडळकर याठिकाणी पोहचलेले नाही. दरम्यान सकाळी पावणे सातच्या सुमारास ते आपल्या घरातून बैलगाडा शर्यतीच्या ठिकाणी जाण्यास निघाले आहेत. काही वेळातच त्यांच्या हस्ते बक्षीस वितरणाचा कार्यक्रम याठिकाणी पार पडणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- टीम इंडियासाठी धोकादायक इंग्लंडचा खेळाडू संघाबाहेर, ‘हे’ आहे कारण
- हिंदू धर्मियांच्या भावना दुखावणारा ‘हा’ निर्णय रद्द करा; शिवसेनेची नागरिकांसह नगरविकास मंत्र्यांकडे धाव!
- ‘ना खाऊंगा, ना खाने दूंगा’ हे भाजपने सिद्ध करावे; ACB धाड प्रकरणी काँग्रेसचं आव्हान
- “विधानसभेची निवडणूक होईल तेव्हा आशाताईंना आपण आमदार झालेले पाहू”
- मराठा आरक्षणासाठी २ सप्टेंबरला राज्यभरात कलेक्टर कचेरीसमोर आंदोलन करणार-विनायक मेटे