सांगलीत मिळतोय पडळकरांना उत्स्फूर्त प्रतिसाद

सांगली : वंचित बहुजन आघाडीचे सांगली लोकसभेचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांना ग्रामीण भागातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. कॉर्नर बैठका, घरोघरी प्रचार, आदीच्या माध्यमातून तरुण कार्यकर्तेसह जेष्ठ नागरिक देखील मोठ्या उत्साहाने पडळकर यांचा प्रचार प्रसार खेडोपाडी, गल्लीबोळात करीत आहेत. नांद्रे, वसगडे, ब्रह्मनाळ, कर्नाळ येथे पार पडलेल्या बैठकीत हजरोच्या संखेने नागरिक उपस्थित होते व सर्वानी गोपीचंद पडळकर यांनाच विजयी करणार असल्याची भूमिका घेतली आहे, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे नेते अमोल वेटम यांनी दिली.

विविध प्रभागात, रॅली, सोशल मिडीयाच्या माध्यमातून लोकांपर्यंत वंचित बहुजन आघाडीची भूमिका पोहचवण्याचे काम कार्यकर्ते करीत आहेत. सद्याचे सरकार भारतीय संविधान व आरक्षण विरोधी आहे, त्यामुळे अशा जातीयवादी शक्तींना जनतेने दूर ठेवावे व गोपीचंद पडळकर यांनाच विजयी करावे असे आवाहन अमोल वेटम यांनी केले. तसेच सत्ताधारी यांच्या कोणत्याही अमिषाला बळी पाडू नये असे आवाहन संजय कांबळे, रतन तोडकर यांनी केले.

https://www.youtube.com/watch?v=ZDYSgivQ3pU