‘महाराजांचे नाव घेता आणि राजकीय फायद्यासाठी जातीचा वापर करता… लाज वाटली पाहिजे’

dr amol kolhe

पुणे : अठरापगड जातींना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची, संभाजीराजांची भूमिका करता, पदोपदी त्यांचे नाव घेता आणि राजकीय फायद्यासाठी जातीचा वापर करता. तुम्हाला लाज वाटली पाहिजे, अशा शब्दांत आमदार बाबुराव पाचर्णे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शिरूरचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्यावर तोफ डागली आहे.

Loading...

शिवसेना-भाजप-रासप-आरपीआय-शिवसंग्राम-रयत क्रांती महायुतीचे उमेदवार खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ वाघोली येथे झालेल्या कोपरासभेत ते बोलत होते. छत्रपती संभाजीराजांवरील मालिकेसाठी आपण स्वतःचे घर विकल्याचे खोटे सांगून शंभुप्रेमी तरुणांची सहानुभूती मिळविण्याचा केविलवाणा प्रयत्न करणाऱ्या डॉ. अमोल कोल्हे यांचे पितळ उघडे पडले असून, एका वृत्त वाहिनीने त्यांचा खोटेपणा उघड केला आहे. अशा माणसाला छत्रपती शिवाजी महाराज व संभाजीराजांचे नाव घेत मतांचा जोगवा मागण्याचा अधिकार आहे का, असा सवाल पाचर्णे यांनी केला.

लोकांना अॅक्टिंग करणाऱ्या अभिनेत्याची गरज नसून, आढळरावदादांसारख्या लोकनेत्याची गरज आहे. लोकसभेत वा राज्यसभेत गेलेल्या एकाही अभिनेत्याने तिथे कधी तोंड तरी उघडलंय का? लोकांना कधी ही नटमंडळी भेटल्याचं तरी आठवतंय का? अशा लोकांना संसदेत पाठवून मतदारसंघाचं वाटोळं करायचं का, असा सवाल आमदार पाचर्णे यांनी उपस्थितांना विचारला.

या वेळी जिल्हा परिषद सदस्य माऊली आबा कटके, तालुकाप्रमुख राजेंद्र पायगुडे, भाजपचे तालुकाध्यक्ष रोहिदास उंडरे, रामदास दाभाडे, दादासाहेब सातव, संजय सातव पाटील, काळूराम मेमाणे, नारायण आव्हाळे, जिल्हा संघटक श्रद्धी कदम, तालुका संघटक सविता कांचन, पूनम चौधरी, युवराज दळवी, राजेंद्र तांबे, मिलिंद हरगुडे, रमेश भोसले, चित्तरंजन गायकवाड, सुनील कांचन, काका कुंजीर, माऊली माथेफोड, स्वप्नील कुंजीर, अनिल कुंजीर आदी उपस्थित होते. तत्पूर्वी खासदार आढळराव पाटील यांनी हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती, लोणी-काळभोर, उरळी कांचन, शिंदवणे, वळती, तरडे, सोरतापवाडी, पेठ, नायगाव, थेऊर, कोलवडी, केसनंद, आव्हाळवाडी आदी गावांचा दौरा केला.Loading…


Loading…

Loading...