कोरियन सुपर सीरिजमध्ये पी.व्ही सिंधूला जेतेपद

जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत जपानच्या नोझुमी ओकुहाराने केलेल्या पराभवाची  परतफेड सिंधूने कोरिया ओपन सुपर सीरिजमध्ये ओकुहारावर मात करत केली आहे.

पी.व्ही सिंधूनं कोरिया सुपर सीरिजचं जेतेपद पटकावलं आहे. 22-20, 11-21, 21-18  अशा सेटमध्ये सिंधूने ओकुहारावर मात केली. कोरिया सुपर सीरिज जिंकाणारी सिंधू हि पहिलीच भारतीय बनली आहे.

अंतिम सामन्याचा खेळ सुरु झाला तेव्हा सिंधूने ओकुहाराला टक्कर देत २२-२० ने जिंकला. मात्र दुसऱ्या सेटमध्ये ओकुहाराने २१- ११ विजय मिळवला. दोघींची बरोबरी झाल्याने सर्वांचे लक्ष तिसऱ्या सेटकडे लागले. तिसऱ्या सेटमध्ये आघाडी घेत सिंधूने २१-१८ ने जिंकला

 

 

 

Comments
Loading...