पंतप्रधान मोदींनी केले आदित्य ठाकरेंच अभिनंदन

सध्या महाराष्ट्र असो कि केंद्रातील राजकारण भाजप शिवसेना नेते एकमेकावर टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. अशातच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे याचं चांगलच कौतुक केल आहे. मात्र हे राजकीय कौतुक नसून आज सकाळी आदित्य ठाकरे यांनी मुंबईत रस्त्यावर केलेल्या सफाईचे आहे.

झाल अस कि पंतप्रधान मोदी यांच्या ‘स्वच्छता ही सेवा’ या अभियानात आदित्य ठाकरे यांनी सहभाग नोंदवत वांद्रे बँडस्टँड परिसरात साफसफाई केली. यावेळी आदित्य यांच्या बरोबरच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने मुलगा अर्जुनसह सफाई केली. आदित्य ठाकरे आणि सचिन तेंडुलकर यांनी ट्विट करुन स्वच्छतेचा संदेश दिला होता.

यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन या दोघांचं कौतुक केल आहे. ट्विटमध्ये मोदी म्हणाले, “माझा तरुण मित्र आदित्य ठाकरे यांनी स्वत:हून स्वच्छता ही सेवा या अभियानात सहभागी होऊन मुंबईत साफसफाई केली त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो”