नवी दिल्ली: टेक्सासच्या उवाल्डे येथील रॉब एलिमेंटरी स्कूलमध्ये मंगळवारी झालेल्या गोळीबारात किमान 19 मुले आणि दोन शिक्षकांचा मृत्यू झाला, असे टेक्सासच्या सार्वजनिक सुरक्षा विभागाने म्हटले आहे. या घटनेने जगभर हळहळ व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवरच काँग्रेस नेते पी. चिदंबरम (P. Chidambaram) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“टेक्सासमधील एका शाळेत झालेल्या भीषण हत्येचा निषेध करण्यासाठी शब्द नाहीत. संपूर्ण जग अमेरिकन जनता आणि शोकग्रस्त कुटुंबांसोबत आहे. या घटना रोखण्यासाठी एक मार्ग म्हणजे बंदुकी नियंत्रणे लादणे आणि शस्त्रे कोण विकत घेऊ शकतात किंवा मालकी घेऊ शकतात यावर कठोरपणे निर्बंध घालणे. याबाबतीत अमेरिकन कायदे फारच सैल आणि अतिशय सौम्य आहेत. भारतानेही अग्निशस्त्रे घेणे आणि ताब्यात घेणे यासंबंधीचे कायदे कडक करणे आवश्यक आहे.”, असे पी. चिदंबरम यांनी ट्वीट करत म्हटले आहे.
One way is to impose severe gun controls and severely restrict who can buy or own a weapon
American laws are too loose and too lenient in this regard
India too needs to review and tighten laws relating to acquisition and possession of fire-arms
— P. Chidambaram (@PChidambaram_IN) May 26, 2022
दरम्यान यावरूनच अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा (Barack Obama) यांनीही चिंता व्यक्त केली आहे. “देशभरात, पालक आपल्या मुलांना अंथरुणावर झोपवतात, कथा वाचत असतात, मात्र त्यांच्या मनात मुलांना शाळेत सोडल्यानंतर किंवा त्यांना किराणा दुकानात घेऊन गेल्यानंतर उद्या काय होईल याची काळजी असते.”, असे ट्वीट ओबामा यांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “एकीकडे महाराष्ट्रात साधूंना ठेचून मारलं जातं, दुसरीकडे…”, ‘मनसे’चा टोला
- IPL 2022 LSG vs RCB Eliminator : लखनऊचा खेळ खल्लास..! रजत पाटीदार ठरला बंगळुरूच्या विजयाचा हिरो
- IPL 2022 LSG vs RCB Eliminator : धमाकेदार पाटीदार..! लखनऊची धुलाई करत रजतनं रचला विक्रम; शतक ठोकलं आणि…
- IPL 2022 LSG vs RCB Eliminator : राहुलसेनेला एकटा भिडला ‘शतकवीर’ पाटीदार..! बंगळुरूचा लखनऊसमोर २०७ धावांचा डोंगर
- ICC Player Test Ranking 2022: फलंदाजीत विराटची १०व्या स्थानावर घसरण, तर अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत जडेजा अव्वल; वाचा!
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<