नवी दिल्ली: नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडीने काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि राहुल गांधी यांना समन्स बजावलेले आहे. आज (२१ जुलै) सोनिया गांधी या चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर होणार आहेत. याविरोधात काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली असून आज देशभरात आंदोलन केले जात आहे. यावरूनच कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम (P. Chidambaram) यांनी ईडीवर ताशेरे ओढले आहे.
“सोनिया गांधी यांना ईडीच्या समन्सचा आम्ही निषेध करत आहोत. AJL-यंग इंडिया व्यवहाराची नोंद खात्याच्या वहीत, दोन कंपन्यांनी भरलेली रिटर्न आणि आयकर विवरणपत्रांमध्ये केली आहे. ईडीला जे काही जाणून घ्यायचे आहे ते सर्व रेकॉर्डमध्ये आढळू शकते. आयकर प्रकरण सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. ED सुप्रीम कोर्टापेक्षा सर्वोच्च नाही. ईडीला कशाचा तपास करायचा आहे? सदरील तपास सुप्रीम कोर्टाद्वारे तपासला जाणार नाही का? ईडी सुप्रीम कोर्टाच्या वर पोहोचून काँग्रेस पक्षाला धमकावण्याचा प्रयत्न करत आहे. काँग्रेस पक्ष धमक्यापुढे झुकणार नाही.”, असे पी. चिदंबरम यांनी म्हटले आहे.
The Income Tax case is pending before SC
ED is not higher than the SC
What is that the ED wants to 'investigate'
that will not be examined by the SC?ED is overreaching the SC and trying to intimidate the Congress party. The Congress party will not bow down to the intimidation
— P. Chidambaram (@PChidambaram_IN) July 21, 2022
“हा देशातील प्रत्येक महिलेचा…”- नाना पटोले
महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी हा देशातील प्रत्येक महिलेचा अपमान असल्याचे म्हटले आहे. “यंग इंडियन आणि नॅशनल हेराल्डचा मुद्दा हा कोणत्याही मनी लाँड्रिंगचा किंवा भ्रष्टाचाराचा नाही, तर ही सध्याच्या भाजप सत्तेच्या अहंकाराची उपज आहे, जी स्त्री राजकीयदृष्ट्या एवढी उंची कशी गाठू शकते हे पचवता येत नाही. सोनिया गांधींनी आपल्या सासूबाईंना आपल्या मिठीत गुदमरताना पाहिले आहे, सोनिया गांधींनी आपल्या शहीद पतीचा विकृत मृतदेह डोळ्यांसमोर पाहिला आहे; एवढे असूनही त्यांचे ध्येय एकच आहे, ते म्हणजे त्या या देशाच्या सून आहेत आणि त्यांच्या रक्ताचा शेवटचा थेंब या देशाच्या मातीत सापडेल. आज पीएम मोदी आणि त्यांचे सरकार सोनिया गांधींना ईडीसमोर बोलावत नाहीत, तर या देशासाठी काहीतरी करू पाहणाऱ्या देशातील प्रत्येक महिलेला अपमानित करण्याचा प्रयत्न करत आहेत.”, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Ramdas Athawale : शिवसेना फोडणारे शरद पवार नसून संजय राऊत होते; रामदास आठवलेंची जोरदार टीका
- vinayak raut : “लोकसभाध्यक्षांनी आमच्या पत्राची दखल न घेता…”, विनायक राऊतांचा गंभीर आरोप
- Maharashtra Politics | “अशा सत्तेला चिमट्यानेही स्पर्श…” ; महाराष्ट्रातील राजकीय संकटात अटलबिहारी वाजपेयींचे भाषण व्हायरल
- Eknath Shinde : आम्ही बांठिया आयोगाशी चर्चा करून अडचणी दूर केल्या – एकनाथ शिंदे
- Sandhya Sawalakhe : लोकांची घरे बरबाद करण्याचे कार्यक्रम बंद करा; संध्या सव्वालाखेंनी चित्रा वाघांना फटकारलं
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<