केंद्र सरकारने मूर्खपणाचा सल्ला ऐकल्याने सामान्य नागरिकांना होणार तोटा; पी चिदंबरम यांची टीका

टीम महाराष्ट्र देशा – देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन जाहीर केलेलं आहे. सर्व अर्थीक व्यवहार ठप्प पडले असून याची मोठी किंमत देशाला मोजावी लागत आहे. जनतेचे आणि सरकारचे उत्पन्नाचे स्रोत बंद झाल्याने आता त्याची झळ सर्वांनाच बसू लागली आहे. काल महाराष्ट्र सरकारने कर्मचार्यांच्या वेतनाचे टप्पे करून आर्थिक घडी बसवण्याचा प्रयत्न केला. तसेच केंद्र सरकारकडे १६००० कोटींची थकबाकी तसेच आर्थिक मदतीची मागणी केली आहे.

नागरिकांचे उत्पन्नाचे स्रोत बंद झालेले असतानाच आता केंद्र सरकारच्या निर्णयाने नागरिकांच्या व्याजातून येणाऱ्या उत्पन्नातही घट होणार आहे. सरकारने काल पीपीएफ वरील व्याज दर ७.९% वरून ७.१ % केला आहे. तर पाच वर्षाच्या नॅशनल सेव्हिंग प्रमाणपत्रवर व्याज ७.९ % वरून ६.८ % पर्यंत खाली आणले आहेत. किसान विकास पत्रबाबतीत व्याज ७.६ % वरून ६.९ % वर तर सुकन्या समृद्धी योजनेत ८.४% वरून ७.४% एवढी घट केली आहे. जेष्ठ नागरिकांच्या बचतीवरील व्याजदर ८.६% वरून ७.४% वर आणण्यात आले आहे.

आता माजी अर्थमंत्री आणि कॉंग्रेस खासदार पी चिदंबरम यांनी केंद्र सरकारवर चांगलीच टीका केली आहे. ‘मला माहित आहे सरकार काही वेळा मूर्खपणाच्या सल्ल्यांवर निर्णय घेते. परंतु हा सल्ला किती मूर्ख पणाचा आहे. तांत्रिक दृष्ट्या ही घट योग्य असली तरी ही वेळ चुकीची आहे. सध्या आर्थिक स्रोत आटले असताने लोकांना व्याजाच्या उत्पन्नावर अवलंबून राहवे लागणार आहे. त्यामुळे ३० जूनपर्यंत मागील तिमाहीचेच व्याजदर ठेवावे’ अशी विनंती त्यांनी केली आहे.

देशाचा २०१९-२० मधील विकासदर ४.८ % असेल असेही चिदंबरम यांनी भाकीत केलं आहे. तसेच याघडीला विकासापेक्षा मानसांच जीवन   यवाचवणे महत्वाचं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. सरकारकडून त्यांनी दुसर्या आर्थिक पॅकेजची मागणी केली आहे.

हेही पहा –