fbpx

हायव्होल्टेज ड्राम्यानंतर पी. चिदंबरम यांना अटक, कॉंग्रेस नेते आक्रमक

टीम महाराष्ट्र देशा : आयएनएक्स मीडिया घोटाळ्य़ाप्रकरणी काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांना अटक करण्यात आली आहे. बुधवारी रात्री दोन तास चाललेल्या हायव्होल्टेज ड्राम्यानंतर चिदंबरम यांना अटक झाली. त्यांना अटक होताच कॉंग्रेस नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

चिदंबरम यांच्यावर आयएनएक्स मीडिया प्रकरणात भ्रष्टाचार आणि आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप आहे. हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने अटकपूर्व जमीन नाकारल्यानंतर गेल्या ७२ तासापासून ईडी आणि सीबीआय त्यांचा शोध घेत होती. अखेर काल रात्री पुढे येत चिदंबरम यांनी काँग्रेस मुख्यालयात पत्रकार परिषद घेतली. यामध्ये आपल्यावरील सर्व आरोपांचे खंड केले.

पत्रकार परिषद संपताच सीबीआयचे अधिकारी त्यांच्या अटकेसाठी काँग्रेस मुख्यालयात पोहोचले, मात्र कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या गराड्यात चिदंबरम यांनी घरी पळ काढला. अखेर रात्री १० : १५ च्या सुमारास अटक केली.

महत्वाच्या बातम्या