पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात जागतिक ओझोन दिवस उत्साहात साजरा

टीम महाराष्ट्र देशा : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात आज जागतिक ओझोन दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. येथील भूशास्त्र संकुलातील पर्यावरणशास्त्र विभागामध्ये झालेल्या या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद लाभला. पर्यावरणशास्त्र विभागप्रमुख डॉ. विनायक धुळप यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले तसेच त्यांनी ओझोन केमिस्ट्री आणि त्याचे वातावरणात असणारा महत्व आणि त्याच्या ऱ्हासामुळे मानवी जीवनावर व वातावरणीय बदलावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

जागतिक ओझोन दिवसाच्या 2019 या वर्षाची थीम ध्यानात घेऊन गेल्या 32 वर्षांत झालेले जागतिक पातळीवर होत असलेले प्रयत्न व त्याला आलेले यश याबद्दल विनायक साळुंखे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच ओझोन बद्दल व्हिडीओ माहितीपट दाखवण्यात आला.
नंदकिशोर खुणे यांनी ओझोनच्या ऱ्हासाला कारणीभूत असणाऱ्या घटकांची माहिती दिलीया कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना ओझोनबद्दल भरपुर माहीती प्राप्त झाली आणि शाश्वत जीवनशैली जगण्याची प्रतिज्ञा घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली.