करकरे आमच्यासाठी हिरो आहेत , जनतेने आता भाजप उमेदवारांबाबत विचार करावा : ओवैसी

टीम महाराष्ट्र देशा : मध्यप्रदेशातील भोपाळ मतदार संघासाठी भाजपाकडून मालेगाव बॉम्बस्फोटाच्या आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर हिला उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांची उमेदवारी आता चर्चेचा विषय बनली आहे. तर आता दुसरीकडे साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर हीने मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल वादग्रस्त आणि बेताल वक्तव्य केले आहे. तर या वक्तव्याची सामाजिक आणि राजकीय स्तरातून निंदा केली जात आहे.

साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर ही हेमंत करकरे विषयी बोलताना म्हणाली की, मी हेमंत करकरे यांना तुझा सर्वनाश होईल असा शाप दिला होता आणि २१ दिवसातच मुंबईच्या दहशतवादी हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. असे तथ्यहीन वक्तव्य केल्याने साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या वर टीका होत आहेत तर भाजपला देखील या टीकेला बळी पडत आहे.

या वक्तव्यावर एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, जे हेमंत करकरे दहशतवादी हल्ल्यात शहीद झाले त्यांच्या विषयी भाजप उमेदवार उलट सुलट वक्तव्य करत आहेत ते अतिशय चुकीचे आहे. हेमंत करकरे हे आमच्यासाठी हिरो आहेत. त्यामुळे आता जनतेने देखील विचार करायला हवा की, जे करकरे दहशतवादी हल्ल्यात शहीद झाले त्यांच्या विरोधकांना मत द्यावे का.

Loading...