मुस्लिम आरक्षणावरून औवेसी आक्रमक, मुस्लिम गटारात असतील तर त्यांना बाहेर काढा

टीम महाराष्ट्र देशा : संसदेमध्ये  पंतप्रधान नरेंद्र  मोदींच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिले अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात मुस्लिम आरक्षणाच्या मुद्याने जोर पकडला आहे. तर एआयएमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन औवेसी यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. भाजपामधून किती मुस्लीम खासदार निवडून आले आहे? मागासवर्गीयांना आरक्षण देण्याची भाषा करता मुस्लिमांना आरक्षण का देत नाही? जर मुस्लिम गटारात राहत असतील तर त्यांना गटारातून बाहेर काढा असं औवेसी मोदींना म्हणाले.

Loading...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर उत्तर दिलं. यावेळी मोदींनी एका काँग्रेस नेत्याने मुस्लिमांवर केलेल्या वक्तव्याची आठवण करू दिली. जर मुस्लिमांना गटारात राहायचं तर राहू द्या असं विधान काँग्रेसच्या मंत्र्याने केलं होतं. त्यानंतर सभागृहात विरोधकांनी गोंधळ घातला होता. आज त्याच घटनेवरून औवेसी यांनी मोदींवर निशाना साधला .

इतकेच नाही तर बाबरी मस्जिदवरूनही ओवैसी यांनी मोदींना कहिओ सवाल केले. औवेसी म्हणाले की, मोदींना शाहबानो आठवते, मग अखलाक, तबरेज अन्सारी, पेहलु खान आठवत नाही का? असा सवाल औवेसी यांनी केला असून नरसिंहराव यांच्या सरकारच्या काळात बाबरी मस्जिद पाडली गेली अशी टोलाही औवेसी यांनी मोदींवर लगावला आहे .Loading…


Loading…

Loading...