मोदी म्हणतात मी चार तास झोपतो, मग आमच्यावर उपकार करता का? : असदुद्दीन ओवेसी

टीम महाराष्ट्र देशा : देशात लोकसभा निवडणुक ही अंतिम टप्यात आली असतानाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बॉलिवूड कलाकार अक्षय कुमारला अराजकीय मुलाखत दिली. त्यामुळे नरेंद्र मोदी यांची ही आगळी वेगळी मुलाखत आता चांगलीच ट्रोल होत आहे. तर दुसरीकडे मोदी विरोधी नेते मोदींच्या या मुलाखतीची खल्ली उडवत आहेत. एमआयएम नेते असदुद्दीन ओवेसी यांनी देखील नरेंद्र मोदींना टोला मारला आहे. “टीव्हीवरील अँकर त्यांच्यासारखी अॅक्टिंग करु शकत नव्हते म्हणून मोदी खऱ्या अॅक्टरला घेऊन आले. असा टोला ओवेसी यांनी लगावला आहे.

धुळे मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार नबी अहेमदुल्ला यांची मालेगावात प्रचारसभा झाली त्यावेळी ओवेसी बोलत होते. ते म्हणाले की, टीव्हीवर मुलाखत झाली मित्रों की, अँकर त्यांच्यासारखी अॅक्टिंग करु शकत नव्हते. मग मोदी खऱ्या अॅक्टरला घेऊन आले. घरात बसून मुलाखत दिली. असं वाटत होतं की मोदी सर्वात मोठे अभिनेते आहे. त्यामुळे अॅक्टरही गोंधळला की, अरे मला तर अॅक्टिंगसाठी पैसे मिळतात आणि हे तर माझ्यापेक्षा चांगली अॅक्टिंग करतात. ते बोलतात की चार तास झोपतो, मग आमच्यावर उपकार करता का? अशी टीकाही ओवेसींनी केली.

दरम्यान राजकीय स्तरातून मोदींच्या या मुलाखतीची खल्ली उडवली जात आहे. अभिनेत्याशी नव्हे, तर शेतकऱ्यांची सवांद साधायला हवा असे परखड मत काँग्रेसच्या पूर्व उत्तर प्रदेश सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी व्यक्त केले होते. तर जयंत पाटील यांनी नरेंद्र मोदी यांनी रविशकुमारलाही एखादी मुलाखत द्यावी, असा टोला लगावला होता.Loading…
Loading...