‘मोदी आणि नितीशकुमार यांच्यातलं प्रेम लैला-मजनूपेक्षा अधिक मजबूत’

owesi

नवी दिल्ली – आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशात निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये जोरदार आरोप- प्रत्यारोप होताना दिसत आहेत. एमआयएम चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी बिहारमध्ये सभा घेताना नितीश कुमार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली.

बिहारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नितीशकुमार यांच्यातलं प्रेम लैला-मजनू यांच्या प्रेमापेक्षा अधिक मजबूत आहे असा टोला असदुद्दीन ओवैसी यांनी लगावला आहे. बिहारच्या किशनगंज येथे निवडणुकीच्या प्रचारसभेला संबोधित करताना ओवैसी बोलत होते.

यावेळी बोलताना ओवैसी म्हणाले की, नितीश कुमार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात खूप प्रेम आहे. लैला-मजनू यांच्या प्रेमापेक्षा अधिक मजबूत असं त्यांचे प्रेम आहे. जेव्हा कधीही नितीश कुमार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेमाबद्दल लिहिलं जाईल तेव्हा या दोघांतील लैला कोण? आणि मजनू कोण? हे मला विचारू नका, त्यांचा निर्णय तुम्ही करा असं ओवैसी यांनी सांगितले.