शरद पवार संविधान नव्हे तर पुतण्याला बुडण्यापासून वाचवू इच्छित आहेत : ओवेसी

टीम महाराष्ट्र देशा- शरद पवार संविधान वाचविण्याची भाषा करताहेत, पण ते पुतण्याला बुडण्यापासून वाचवू इच्छित आहेत अशा शब्दांत एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी नाव न घेता शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. औरंगाबाद येथे बहुजन वंचित विकास आघाडीची पहिली जाहीर सभा मंगळवारी पार पडली, यावेळी ते बोलत होते.

राज्यात सध्या संविधान बचावच्या घोषणा दिल्या जात आहेत. जे लोक राज्यात अशा घोषणा देत आहेत. त्यांनी आपल्या कुटुंबाला वाचवावे संविधान वाचवण्यासाठी आम्ही सक्षम आहोत.शरद पवार संविधान वाचविण्याची भाषा करताहेत, पण ते पुतण्याला बुडण्यापासून वाचवू इच्छित आहेत, असा आरोपही त्यांनी केला आहे. प्रकाश आंबेडकर यांना लोकसभेत पाठवून बाबासाहेबांचे ऋण फेडू, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.