fbpx

पीडीपीद्दल कुठल्याही प्रकारची सहानभूती नाही : ओवेसी

टीम महाराष्ट्र देशा : भाजपने जम्मू-कश्मीर सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी तातडीने राजीनामा दिला आहे. मेहबुबा यांनी राज्यपालांकडे आपला राजीनामा सुपुर्द केला.जम्मू कश्मीर मध्ये भाजप आणि पीडीपी ची युती तुटल्यानंतर आता एमआयएम पक्षाचे प्रमुख अससुद्दिन ओवेसी यांनी या युतीबद्दल कुठल्याही प्रकारची सहानभूती नसल्याच म्हटलं आहे.

ओवेसी यांनी सांगितलं की पीडीपी साठी हे राजकीय संकट आहे. पीडीपी आणि नशनल कॉन्फरन्सने यातून धडा घेतला पाहिजे. मोदी सरकारने पुकारलेली एकतर्फी शस्त्रसंधी, जाँबाज जवान औरंगझेब याची दहशतवाद्यांनी केलेली हत्या, आतंकवादी कारवाया असतील,सीमेवरील हल्ले, रायझिंग कश्मीरचे संपादक शुजात बुखारींची दहशतवाद्यांनी केलेली हत्या असेल याला भाजपला जबाबदार ठरवले आहे.भाजप या जबाबदारीतून पळ काढू शकत नाही अशी टीका ओवेसी यांनी केली आहे.

दरम्यान,जम्मू कश्मीरमध्ये भाजपने पीडीपी सोबत युती तोडली आहे. भाजपच्या कोअर कमिटीची आज बैठक झाली. त्यामध्ये आज हा निर्णय घेण्यात आला. मोदींच्या काळात प्रथमच भाजप सत्तेतून बाहेर पडले आहे.काश्मिरमध्ये काँग्रेस पीडीपीला पाठिंबा देणार नसल्याचं कॉंग्रेस नेते गुलाब नबी आझाद यांनी स्पष्ट केलं आहे. नुकतेच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय जनता पक्षाने जम्मू काश्मिरच्या पीडीपी सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच नॅशनल कॉनफरन्स आणि काँग्रेस ने देखील पीडीपीला समर्थन देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता आहे.

काश्मिरमध्ये काँग्रेस पीडीपीला पाठिंबा देणार नाही : गुलाब नबी आझाद

भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी आज महत्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये जम्मू-कश्मीरचे सगळे मंत्री, आमदार आणि प्रमुख नेते यांना बोलावण्यात आलं होत. कश्मीरमधल्या परिस्थितीबाबत या बैठकीत विस्ताराने चर्चा होणं अपेक्षित आहे. मोदी सरकारने पुकारलेली एकतर्फी शस्त्रसंधी, जाँबाज जवान औरंगझेब याची दहशतवाद्यांनी केलेली हत्या, रायझिंग कश्मीरचे संपादक शुजात बुखारींची दहशतवाद्यांनी केलेली हत्या यामुळे मोदी सरकारवर देशभरातून मोठ्या प्रमाणावर टीका होत होती.या पार्श्वभूमीवर आज हा निर्णय घेण्यात आला.

जम्मू-काश्मीर विधानसभेतील संख्याबळ

पीडीपी – २८
भाजपा – २५
काँग्रेस – १२
नॅशनल कॉन्फरन्स – १५

जम्मू काश्मीरमध्ये राजकीय भूकंप ; भाजप सत्तेबाहेर

जम्मू कश्मीरमधील अभद्र युतीला उद्धव ठाकरेंचा विरोध होता- संजय राऊत