fbpx

‘औवेसी साहब सुनने की ताकद रखिए!’ अमित शहांनी भर सभागृहात औवेसींना सुनावले

टीम महाराष्ट्र देशा : मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात मोदी सरकारकडून विविध योजनांवर आणि विधेयकांवर चर्चा होत आहे. तर चर्चे वेळी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी होताना दिसत आहे. आज सभागृहात असेचं काहीसे चित्र पाहायला मिळाले. भाजपाध्यक्ष अमित शहा आणि असुदुद्दीन औवेसी या दोघांमध्ये आज खडाजंगी पाहिला मिळाली.

लोकसभेत आज एनआयए म्हणजेच राष्ट्रीय सुरक्षा एजन्सीला अधिक मजबूत बनविणारे सुधारणा विधेयक संमत करण्यात आले. याबाबत खासदार सत्यपालसिंह सरकारतर्फे बाजू मांडत होते. त्याचवेळी, एआयएमआयएमचे प्रमुख खासदार असुदुद्दीन औवेसी यांनी आक्षेप घेतला. आणि सत्यपाल सिंह यांचे भाषण थांबविण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी अमित शाह यांनी औवेसी यांना आधी ऐकून तर घ्या अशा सूचना दिल्या.

यावेळी अमित शहा म्हणाले की, औवेसी साहब सुनने की ताकद रखिए, जब ए राजा बोल रहे थे तब आप क्यों नही खडे हुए, एैसे नही चलेगा, आपको सुनना भी पडेगा.. असे म्हणत अमित शहा यांनी औवेसींना दम भरला. त्यानंतर, सभागृहात काही काळ गोंधळ निर्माण झाला होता.