ओवैसींच्या एमआयएम पक्षांचे ट्विटर अकाउंट हॅक, ‘या’ व्यक्तीचा फोटो पोस्ट केल्याने कार्यकर्ते गोंधळले

नवी दिल्ली : खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्यासमोर आता एक अडचण निर्माण झाली आहे. त्यांचा पक्ष ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल म्हणजेच एमआयएमचे अधिकृत ट्विटर खाते अज्ञातांनी हॅक केले आहे. हॅकर्सने ओवैसींच्या पक्षाच्या नावाऐवजी एलन मस्क यांचे नाव लिहिले आहे. त्याचबरोबर प्रोफाईल फोटो बदलून एलन मस्क यांचा फोटो लावला आहे.

एलन मस्क जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. तसेच स्पेक्सएक्स आणि टेस्लासारख्या कंपनीचे मालक आहेत. हे खातं कुणी हॅक केलं आणि का केलं? याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. पंरतू एमआयएम कार्यकर्त्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, एमआयएमचे ट्विटर अकाउंट हॅक झाल्याने नेटकऱ्यांनी पक्षाला ट्रोल करणे सुरू केले आहे. एकाने प्रतिक्रिया दिली आहे की, पृथ्वी चपटी आहे की गोल हे पाहण्यासाठी एमआयएम पक्ष हा एलन मस्क बनला आहे.

औवेसींचा योगी सरकारवर निशाणा
ओवैसी यांनी उत्तर प्रदेश लोकसंख्या धोरण २०२१-२०३० वरुन टीका केली होती. “डिसेंबर २०२०मध्ये केंद्रातील मोदी सरकारने न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं होतं की जन्मदर घटू लागल्यामुळे देशात दोन अपत्य धोरण राबवता येणार नाही. पण, दुसरीकडे योगी सरकार मात्र त्यालाच विरोध करत आहे. हा प्रस्ताव मांडून योगी सरकार मोदी सरकारच्या विरोधात जाणार का?”, असा प्रश्न ओवैसींनी उपस्थित केला होता.

एमआयएम निवडणूक १०० जागांवर लढणार
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी हे मोठे नेते असल्याचं वक्तव्य करत त्यांनी दिलेलं आव्हान स्वीकारलं आहे. कोणत्याही परिस्थितीत २०२२ मध्ये पार पडणाऱ्या निवडणुकांमध्ये योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्री बनू देणार नाही, असं वक्तव्य ओवेसी यांनी केलं होतं. तसेच, एमआयएम हा पक्ष उत्तर प्रदेशात १०० जागादेखील लढवणार आहे.

महत्वाच्या बातम्या