‘देशाचे जिन्ना होऊन जगाचं तालिबानीकरण आणि इस्लामीकरण करण्याचा ओवैसींचा अजेंडा’

उत्तर प्रदेश : लवकरच उत्तर प्रदेश येथे निवडणुका होणार आहेत. यासाठी सर्व पक्षांनी आपआपल्या तयारी सुरु केल्या आहेत. सध्या येथे जोरदार प्रचार करण्यात येत आहे. मात्र त्यातच आता भाजप आमदाराने एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांच्यावर वादग्रस्त टीका केली आहे.

भाजपा आमदार हरी भूषण ठाकूर यांनी पाटण्यामध्ये बोलताना ओवैसींवर टीका केली आहे. त्यांनी ओवैसींची तुलना थेट पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिन्ना यांच्याशी केली आहे. त्यांचा (असदुद्दीनओवैसींचा) अजेंडा हा धार्मिक आहे. त्यांना देशातील दुसरा जिन्ना व्हायचं आहे. त्यांचा फक्त एकच अजेंडा आहे, तो म्हणजे जगाचं तालिबानीकरण आणि इस्लामीकरण करणं’ असे वक्तव्य भाजप आमदार हरी भूषण ठाकूर यांनी केले आहे.

दरम्यान यापूर्वी ओवैसींवर जातीय तेढ निर्माण केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात असभ्य व अपमानकारक वक्तव्ये केल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. तर आता भाजप आमदाराने वादग्रस्त वक्तव्य करत नव्या वादाला तोंड फोडले आहे.

महत्वाच्या बातम्या