जाणून घ्या ओवेसीच्या विरोधात निवडणूक लढविणाऱ्या शिवसेनेच्या उमेदवाराचं काय झालं ?

टीम महाराष्ट्र देशा- चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखाली दुसऱ्यांदा टीआरएस सत्तेत येणार आहे. तेलंगणामधील प्रचारादरम्यान ओवेसी बंधूंची भाषणे कायमच चर्चेत राहिली. तेलंगणामध्ये टीआरएस आणि एमआयएम युतीने बहुमताचा आकडा पार केला आहे.या निवडणुकीमध्ये अकबरुद्दीन ओवेसी हे सलग पाचव्यांदा निवडून आले आहेत.

१९९९ पासून या मतदारसंघामध्ये एमआयएमने कायमच आपले वर्चस्व राखले आहे. म्हणूनच ओवेसींपुढे टीआरएस सारख्या बड्या पक्षाच्या उमेदवारासहीत काँग्रेस, भाजपा, शिवसेनेबरोबरच कोणत्याही अपक्ष उमेदवारांचा निभाव लागला नाही. विशेष म्हणजे या मतदारसंघामध्ये नोटा हा पर्याय पाचव्या स्थानी राहिला. नोटाला १००९ मते मिळाली.

ओवेसी हे तेलंगणातले मोठे मुस्लिम नेते आहेत. ते मुसलमानांच्या प्रश्नांवर कायम आक्रमक असतात. जुन्या हैदराबादमध्ये असलेल्या सहा विधानसभा जागांवर त्यांचा प्रभाव आहे. विशेष म्हणजे हा विजय मिळवताना चंद्रयानगुट्टा मतदारसंघातून ओवोसी यांनी आपल्या विरोधात उभ्या असणाऱ्या सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त करण्याइतके घवघवीत यश या निवडणुकीत मिळवले आहे. ओवोसी बगळता चंद्रयानगुट्टा मतदारसंघातील १४ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले असून यामध्ये शिवसेनेच्या  सुदर्शन मलकान यांना केवळ १९७ मते मिळाली आहेत.

एमआयएमची धुळे-जळगाव मध्ये एंट्री

लोकसभेची सेमीफायनल- चावलवाला बाबांना धक्का, छत्तीसगड मध्ये कॉंग्रेस आघाडीवर

लोकसभेची सेमीफायनल- अटलबिहारींच्या पुतणीनेच वाढवली चावलवाला बाबांची धाकधूक

You might also like
Comments
Loading...