ओवेसी हेच भाजपचे ‘चाचाजान’; राकेश टिकैत यांचे टीकास्त्र

owaisi-tikait

उत्तर-प्रदेश : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२ च्या पार्श्वभूमीवर राजकीय क्षेत्रात चढाओढ सुरु झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे. काहीदिवसांपूर्वीं कुशीनगर येथे बोलत असतांना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपल्या भाषणात ‘अब्बाजान’या शब्दाचा उल्लेख केला. हा शब्दप्रयोग त्यांनी एका विशिष्ट समाजाला उद्देशून केला असल्याचे बोलले जात होते. त्यामुळे मोठ्याप्रमाणात त्यांच्यावर टीकास्त्रांचा वर्षाव करण्यात आला. हे प्रकरण ताजे असतांनाच आता ‘चाचाजान’ या शब्दाचे आगमन झाले आहे.

बागपतमध्ये दाखल झालेल्या भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी मंगळवारी (१४ सप्टें) बागपतच्या टटीरी गावात शेतकऱ्यांची भेट घेतली यावेळी त्यांनी एआयएमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्यावर निशाणा साधत टीकास्त्रांचा प्रहार केला आहे. ते म्हणाले की,’भाजपाचे ‘चाचाजान’ ओवेसी आता उत्तर प्रदेशात आले आहेत. तेच भाजपाला विजयाकडे घेऊन जातील. आता काहीच अडचण नाही’.

दरम्यान, यावेळी टिकैत यांनी विजेचे दर आणि एमएसपीसंदर्भात निवेदनही दिले. यासंदर्भात ते म्हणाले की,’देशातील सर्वात महाग वीज यूपीमध्येच आहे. तसेच ‘शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांसाठी योग्य हमीभाव मिळत नाही. उसासाठी किमान आधारभूत किंमत ही ६५० रुपये प्रति क्विंटल असायला हवी’ असेही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या