हिंदू मतं मिळवण्यासाठी असदुद्दीन ओवैसी यांनी बांधला भगवा फेटा

ovesi1

बेळगाव: राजकारणात कोण काय करील सांगता येत नाही. निवडणुकीच्या वेळेस राजकीय नेत्यांचा स्वार्थीपणा स्पष्ट होतो. तो मग मतदारांच्या नजरेतून सुद्धा चुकत नाही. एमआयएम पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी बेळगावमध्ये निवडणुकीच्या प्रचारसभेत भगवा फेटा घालून भाषण केलं. त्यामुळे चर्चेला उधान आलं आहे.

Loading...

खासदार ओवैसी नेहमी हिंदुत्व आणि भगवा दहशतवाद असा शब्दप्रयोग केला आहे. मात्र बेळगावमध्ये त्यांनी चक्क भगवा फेटा परिधान केला. त्यामुळे मतदार चांगलेच बुचकळ्यात पडले. बेळगावमध्ये हिंदू मतदान जास्त असल्यामुळे ओवैसी यांनी हा फेटा परिधान केला ? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत एमआयएम या पक्षाने जेडीएस सोबत युती केली आहे आणि जेडीएसच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी ओवैसी बेळगावमध्ये आले होते.

दरम्यान, ओवैसी यांनी आपल्या भाषणातून पंतप्रधान नरेंद्र मोदी , भाजप अध्यक्ष अमित शहा आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.Loading…


Loading…

Loading...