‘मेहरम’ प्रथा बंद वरून ओवेसींचा मोदींवर निशाणा

Modi vs owasi (1)

टीम महाराष्ट्र देशा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन कि बात मधून तात्काळ तिहेरी तलाकनंतर मुस्लीम महिलांना हज यात्रेसाठी बंधनकारक असलेली ‘मेहरम’ प्रथा बंद करण्याची घोषणा केली. त्यानंतर इंडिया मुस्लीम पर्सनल लॉसह एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान मोदींच्या या घोषणेबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.

ओवेसी म्हणाले, जे काम परदेशी सरकारनं आधीच केलं आहे त्याचं श्रेय पंतप्रधान का घेत आहेत?
पंतप्रधान मोदींनी ‘मेहरम’बाबत घोषणा केल्यानंतर ओवेसींनी त्यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. ‘सौदी हज अथॉरिटीनं 45 वर्षाहून जास्त वय असलेल्या कोणत्याही मुस्लिम महिलेला महेरमशिवाय हज यात्रा जाण्याची अनुमती दिली आहे. त्यामुळे जे काम परदेशी सरकारनं केलं आहे त्याचं श्रेय पंतप्रधान मोदींनी घेता कामा नये.’ असं ओवेसी यावेळी म्हणाले.