fbpx

ग्रामीण भागातील डॉक्टरांना ओव्हरटाईम देणार !

overtime dr

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागातील डॉक्टरांना ‘ओव्हरटाइम’ देण्याचा निर्णय आरोग्य खात्याने घेतला आहे. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर डॉक्टरांची पदे रिक्त असून ही समस्या सोडविण्यासाठी हा निर्णय झाला. तसेच राज्य सरकार ५०० डॉक्टरांना कंत्राटी पद्धतीवर सेवेत घेणार आहे. ‘ग्रामीण भागात कार्यरत डॉक्टरांना ४० ते ५० हजार पगार असूनही ८ तासांपेक्षा जास्त काम करावे लागते. त्यामुळे डॉक्टर येथे येत नसल्याचे राष्ट्रीय मिशनचे संचालक डॉ. संजीवकुमार यांनी सांगितले.