एल्फिन्स्टन स्थानकावरील चेंगराचेंगरी : पोलिसांनी फोडले गर्दी आणि पावसावर खापर

मुंबई: एल्फिन्स्टन आणि परळ पुलावर झालेली गर्दी आणि अचानक पडलेल्या पावसामुळे चेंगराचेंगरी होऊन २३ जणांचा मृत्यू झाला,असा निष्कर्ष दादर पोलिसांनी काढला आहे. एल्फिन्स्टन चेंगराचेंगरीप्रकरणी पोलिसांनी आपला तपास अहवाल सादर केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी जीआरपी, आरपीएफ आणि रेल्वे स्थानक कर्मचा-यांना क्लीन चीट दिली आहे. तर चेंगराचेंगरीचे मुख्य कारण म्हणजे पाऊस आणि अचानक वाढलेली गर्दी असल्याच अहवालात सांगण्यात आल आहे.

ज्या दिवशी ही घटना झाली तेव्हा एल्फिन्स्टन-परळ स्थानकावर किती प्रवाशी उतरले, याची माहिती आम्ही रेल्वे अधिका-यांकडून मागितली आहे. या शिवाय त्या दिवशी सकाळी १० वाजता किती पाऊस पडला होता,याची देखील माहिती हवामान विभाग आणि मुंबई महापालिकेकडेही मागितली आहे. तसेच ३९ जखमींसह जवळपास ७० जणांची जबाब घेऊन हा निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे.