तीन महिने उलटून देखील २० टक्के विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेच नाहीत

pmc

पुणे : पुणे महापालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या शाळातील विध्यार्थ्यांना महापालिकेकडून गणवेश पुरवण्यात येतात. मात्र शाळा सुरु होऊन तीन महिने उलटून देखील अद्यापी तब्बल 20% विद्यार्थांना गणवेश मिळालेले नाहीत. या महिना अखेर पर्यंत हे गणवेश विद्यार्थ्यांना पोचतील असे महापालिका अधिका-यांकडून सांगण्यात आले आहे.

पुणे महापालिकेच्या अंतर्गत येणार्‍या शाळातील विद्यार्थ्यांना शालेय गणवेश पुरवण्याची जबाबदारी महापलिका प्रशसनाची असून त्यामध्ये दिरंगाई होत असल्याचे चित्र आहे. 15 ऑगस्ट पूर्वी विद्यार्थ्यांना गणवेश पुरवण्यात येतील असे प्रशासनाकडून आश्वासन देण्यात आले होते.मात्र स्वतंत्र दिना दिवशी देखील बर्‍याच विद्यार्थ्यांनी मागच्या वर्षीचे गणवेश घेतले होते.

तर काही विद्यार्थ्यांनी गणवेशाविनाच होते. या विरोधतात शिवसेने कडून जोरदार आंदोलन करण्यात आले होते. तेव्हा प्रशासनाकडून लवकरात लवकर सर्व विद्यार्थ्यांना गणवेश पुरवण्यात येतील असे आश्वासन दिले होते. मात्र आता शाळा सुरु होऊन ३ महिने उलटून देखील सर्व विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेले नाहीत.