fbpx

गडचिरोलीत नक्षलवाद्यांचा धुमाकूळ; २७ हून अधिक वाहने पेटवली

टीम महाराष्ट्र देशा- राज्यभरात महाराष्ट्र दिनाचा उत्साह असताना गडचिरोलीत मात्र काल मध्यरात्री सशस्त्र नक्षलवाद्यांनी रस्त्याच्या कामावरील तब्बल २७  वाहने पेटवल्याची घटना घडली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील दादापूर येथे ही घटना घडली आहे.

पुराडा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या दादापूर इथे राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू होते. गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा येथील रस्ते बांधकाम जागेवर नक्षलवाद्यांनी २७ हून अधिक वाहनांना आग लावली. याच कामावरील ट्रक, जेसीबी, ट्रॅक्टर अशा पन्नासहून अधिक वाहनांसह दादापूर इथल्या डांबर प्लांट, राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचे कार्यालयही जाळण्यात आले आहे. यामध्ये कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

दरम्यान,आज माओवाद्यांनी सी- ६० कमांडो जवानांच्या ताफ्यावर आयईडी स्फोटकांद्वारे भ्याड हल्ला केला आहे. या हल्ल्यात १५ जवान शहीद झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या हल्ल्याची माहिती चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. माओवाद्यांनी केलेल्या या भ्याड हल्ल्याचं सर्व स्तरातून तीव्र शब्दांमध्ये निषेध व्यक्त केला जात आहे.