‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतून संकर्षण पडणार ‘बाहेर’…

‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतून संकर्षण पडणार ‘बाहेर’…

sankarshan

मुंबई : टेलिव्हिजनवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय ठरली आहे. मालिकेतील सर्वच पात्रांना प्रेक्षकांकच्या पसंतीस पडत आहे. मात्र या मालिकेच्या प्रेक्षकांसाठी एक वाईट बातमी आहे. या मालिकेत समीरची भूमिका साकारणारा अभिनेता संकर्षण कऱ्हाडे पुढील काही भागात यश आणि समीरची जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार नाही.

या मालिकेत अभिनेता श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहरे मुख्य भूमिकेत आहेत.  या दोन कलाकारांसोबतच मायरा म्हणजेच परी ही छोटी कलाकार देखील प्रेक्षकांना आपलीशी वाटत आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार संकर्षण कऱ्हाडे हा ‘तू म्हणशील तसं..’ या नाटकात मुख्य भूमिका साकारत आहे. महाराष्ट्र सरकारने मनोरंजन क्षेत्रावरील निर्बंध हटवल्याने नाटक आणि चित्रपट हे थिएटरमध्ये पाहायला मिळणार आहे. या नाटकाच्या सरावामुळे त्याला पुढील काही दिवस ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेच्या शूटींगसाठी वेळ काढणं शक्य होणार नाही. त्यामुळे पुढील काही दिवसांसाठी तो मालिकेतून बाहेर पडावं लागणार आहे. त्यामुळे यश आणि समीरची जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार नाही.

येत्या २३ ऑक्टोबरला संकर्षण कऱ्हाडेच्या ‘तू म्हणशील तसं…’ या नाटकाचा आयोजित करण्यात आला आहे. या नाटकात त्याच्यासोबत अभिनेत्री भक्ती देसाई ही देखील काम करत आहे. या नाटकाचे लेखन स्वत: संकर्षणने केले असून त्याची निर्मिती प्रशांत दामले यांच्या गौरी थेटर्सच्या माध्यमातून केली जात आहे. या नाटकाच्या दौऱ्यामुळे संकर्षण आणि भक्ती या दोघांनी अभिनय करत असलेल्या मालिकांमधून  काही काळा बाहेर आहे. या दौऱ्यातून जसा वेळ मिळेल तसे ते मालिकेत दिसतील, असे बोललं जात असल्याने प्रेक्षकांना त्याची प्रतिक्षा आहे, हे नक्की.

महत्वाच्या बातम्या