दिल्लीत सुरू असलेल्या हिंसाचारामागे बाहेरच्या लोकांचा हात : अरविंद केजरीवाल

टीम महाराष्ट्र देशा : सध्या दिल्लीत सुरू असलेल्या हिंसाचारामागे बाहेरच्या लोकांचा हात असल्याचं मत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे. अरविंद केजरीवाल हे दिल्लीच्या विधानसभेत आज बोलत होते.त्यावेळी त्यांनी अतिमहत्वाच्या प्रश्नावर उपस्थित केलेल्या प्रशावर हे उत्तर दिले.

केजरीवाल पुढे म्हणाले की ‘दिल्लीच्या जनतेला हिंसा नको आहे. काही असामाजिक, राजकीय तत्व हे बाहेरच्या लोकांद्वारे हिंसाचार घडवून आणत आहेत. एक सर्वसामान्य माणूस हे सर्व अजिबात करु शकत नाही. दिल्लीतील स्थानिक हिंदू आणि मुस्लिमांना आपसांत भांडण नको आहे.

Loading...

या हिंसाचारात शहीद झालेले दिल्लीचे पोलीस हेडकॉन्स्टेबल रतनलाल यांच्या कुटुंबियांना १ कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्यात येईल तसेच त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरीत सामावून घेतले जाईल, अशी घोषणाही यावेळी केजरीवाल यांनी यावेळी केली.

दरम्यान, जर गरज असेल तर दिल्लीतील हिंसाचार रोखण्यासाठी केंद्र सरकारने लष्कराला पाचारण करायला हवे. दिल्लीची ओळख दंग्यांनी नव्हे तर चांगले शिक्षण आणि आरोग्यानेच शक्य आहे, असंही केजरीवाल यांनी म्हटलं आहे,दिल्लीत उसळलेल्या आगडोंब त्यामुळे जवळपास २५ लोकांचा मृत्यू झाला आहे.

Loading...
Loading...




Loading…




Top Posts

कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
निलंग्यातील मज्जीदमधून १२ परप्रांतीय पोलिसांच्या ताब्यात !
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
कोरोनामुळे उद्धव ठाकरे सरकारचे भवितव्य टांगणीला ; वाचा 'काय' आहे प्रकरण
धक्कादायक : निलंग्यातील मशीदमधून ताब्यात घेतलेल्या १२ परप्रांतीयांपैकी ८ जणांचा अहवाल पॉझीटीव्ह !
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका
सोन्याच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या आजचे दर
माझं शरीर आहे, माझी मर्जी मी माझ्या शरीरासोबत तेच करेन ! जे मला योग्य वाटतं
आज सांयकाळी आणि उद्या सकाळी दुध मिळणार नाही कारण.....