आरसीबी स्पर्धेतून बाहेर पण ‘या’ गोलंदाजाने केला सर्वात मोठा विक्रम 

rcb

अबुधाबी : इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या हंगामाच्या एलिमिनेटरमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून पराभूत झाल्यानंतर विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ बाद झाला. जरी या सामन्यात संघाचा पराभव झाला आणि त्यांचे पुन्हा एकदा ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले असले तरी देखील संघाचा वेगवान गोलंदाज हर्षल पटेलने आयपीएलच्या या हंगामात चमकदार कामगिरी केली. दरम्यान, काल झालेल्या सामन्यात त्याने दोन बळी मिळवून मोठी कामगिरी केली.

हर्षलने या मोसमात चांगला खेळ दर्शवला आणि तो सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला. या हंगामात, हर्षलने आरसीबीकडून खेळताना 15 सामन्यात 32 विकेट्स घेतल्या. आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंतच्या कोणत्याही मोसमात कोणत्याही गोलंदाजाने घेतलेली ही सर्वाधिक विकेट आहे. त्याने चेन्नई सुपर किंग्जचा दिग्गज खेळाडू ड्वेन ब्राव्होची बरोबरी केली.

हर्षल ब्राव्होशी बरोबरी 

आयपीएलच्या कोणत्याही एका मोसमात सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम आतापर्यंत चेन्नईचा अनुभवी गोलंदाज ब्राव्होच्या नावावर होता. आता या रेकॉर्डवर हर्षलचे नावही संयुक्तपणे कोरले गेले आहे. एलिमिनेटरमध्ये कोलकाताविरुद्ध, हर्षलने 2 विकेट घेत विकेट्सची संख्या 32 वर नेली. 2013 मध्ये ब्राव्होने हा पराक्रम केला, तर 2021 च्या हंगामात हर्षलच्या नावावर ही विशेष कामगिरी जोडली गेली.

एका मोसमात सर्वाधिक विकेट्स

एका मोसमात सर्वाधिक विकेट घेण्याच्या बाबतीत, हर्षलचे नाव आता संयुक्तपणे ब्राव्होसह पहिल्या स्थानावर आले आहे. वर्ष 2020 मध्ये 30 विकेट घेणारा दिल्ली कॅपिटल्सचा गोलंदाज कागिसो रबाडा दुसऱ्या स्थानावर आहे. गेल्या मोसमात बुमराहने मुंबई इंडियन्सकडून खेळताना 27 बळी घेतले होते. त्याने 2017 मध्ये भुवनेश्वर कुमारचा 26 विकेट घेण्याचा विक्रम मोडला. 2017 मध्येच जयदेव उनाडकटने 24 विकेट्स घेतल्या आणि तो हरभजन सिंगसह या यादीत संयुक्तपणे चौथ्या क्रमांकावर आहे.

महत्त्वाच्या बातम्या