आम्ही मिळवलेला विजय देशातील बदलत्या राजकीय परिस्थिचीचा निर्देशक- धनंजय मुंडे

टीम महाराष्ट्र देशा: “साम, दाम, दंड, भेद व यंत्रणा वापरूनही ने मिळवलेल्या पालघरच्या निसटत्या विजयापेक्षा जनतेच्या व्यापक भावनांना थेट साद घालून घालून भंडारा, गोंदीयामध्ये आम्ही मिळवलेला हा विजय हा देशातील बदलत्या राजकीय परिस्थिचीचा निर्देशक आहे.” असे टोले धनंजय मुंडे यांनी लगावले.

भाजपचे बंडखोर खासदार नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या भंडारा – गोंदिया लोकसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली होती. यामध्ये राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे हे विजयी झाले आहेत. तर पालघर मध्ये भाजपचे उमेदवार राजेंद्र गावित विजयी झाले.