‘आमचे कडवे हिंदुत्व कायम राहील’

टीम महाराष्ट्र देशा – कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत आघाडीत असलो तरी शिवसेनेचे कडवे हिंदुत्व कायम राहील, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटलेय. राऊत यांनी आज शिवाजी पार्कवर जाऊन शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे दर्शन घेतले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने झेंडा बदलल्यानंतर त्या पक्षाची भूमिका बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे परंतु शिवसेनेला त्याचा फरक पडत नसल्याचे संजय राऊत म्हणाले.

यावेळी संजय राऊत यांनी मनसेला जोरदार टोला लगावला. वीर सावरकरांनंतर जे हिंदुत्व देशाला अभिप्रेत होते, तो विचार बाळासाहेबांनी रुजवला. काही लोकांना पालवी फुटतेय. ती फुटूंदे, बाळासाहेब आणि शिवसेनेला तोड नाही, असे राऊत यांनी सांगितले.दरम्यान, त्यांनी काही पक्षांविषयी माहिती नाही, असे सांगत मनसेला चिमटा काढला.

Loading...

तसेच शिवसेना आपल्या भूमिकेवर, विचारांवर ठाम आहे. हिंदुत्व हा टक्कर देण्याचा विषय असू शकत नाही, असेही राऊत म्हणाले. सत्ता येत-जात असते. परंतु आपले पाय कायम जमिनीवर ठेवायला आम्हाला बाळासाहेबांनी शिकवले आहे. बाळासाहेब ठाकरे फक्त शिवसेनेचे नाही तर, महाराष्ट्राचे देशाचे दैवत आहे.ते कोणत्याही सत्तेवर, पदावर नव्हते. अलेक्झांडर प्रमाणे ते वावरले, सामान्य लोकांना प्रेरणा दिली. आजही शिवसेना त्यांनी दाखवलेल्या मार्गावरुनच पुढे जात आहे असेही राऊत म्हणाले.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
महाविकास आघाडीचे 'जनक देवेंद्र फडणवीस' आहेत : शिवाजीराव आढळराव पाटील
गोपीनाथ मुंडेंच्या आग्रहाला 'बळी' पडलो; मोदींवर विश्वास ठेवला, मात्र घडलं 'भलतंच'
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
दणका राज ठाकरेंचा ! औरंगाबादमध्ये 'मनसे गद्दाराची' केली 'हकालपट्टी'