आमच्या बहिणीने लहान लहान मुलांच्या चिक्कीत पैसे खाल्ले : धनंजय मुंडे

dhananjay mundhe and pankaja munde 2

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादीची परिवर्तन यात्रा आज पालघर जिल्ह्यातील विक्रमगड येथे पोहोचली आहे. कोकणात आपल्या आक्रमक शैलीत सत्ताधाऱ्यांना धारेवर धरणारे राष्ट्रवादीचे नेते आणि विधापरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी विक्रमगडमधील सभेतही तुफान टोलेबाजी केली.

यावेळी त्यांनी फडणवीस सरकारच्या भ्रष्टाचाराचा पाढा वाचताना, त्यांची बहीण आणि राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्यावरही हल्लाबोल केला. आमच्या बहिणीने तर लहान मुलांच्या चिक्कीचे पैसे खाल्ले, असे म्हणत धनंयज मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्यावर निशाणा साधला.

यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, महिला प्रदेशाध्यक्ष चित्र वाघ, माजी मंत्री गणेश नाईक हेही व्यासपीठार उपस्थित होते.