शिवसेनेला बरोबर घेऊन जाण्याची आमची भूमिका- रावसाहेब दानवे

udhav thakare-danve

नाशिक: शिवसेनेने आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. मात्र शेवसेना खरच स्वबळावर लढणार का? यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. खुद्द मुख्यमंत्र्यांनी भाजप-शिवसेना एकत्र लढण्याचे संकेत दिले होते. भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनीही शिवसेनेला बरोबर घेऊन जाण्याची आमची भूमिका आहे. असे स्पष केले आहे.

रावसाहेब दानवे नाशिक येथील मेळाव्याप्रसंगी पत्रकारांशी बोलत होते, शिवसेना आमच्यासोबत आहे, सेनेने सोबत राहावे, ही आमची भूमिका आहे. परंतु, पुढील निर्णय परिस्थितीनुसार घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले. प्रत्येक राज्यात भाजपाचे मित्र पक्ष आपला अजेंडा राबवित आहेत. भाजपाने शेतकऱ्यांचा नेहमीच सहानुभूतीपूर्वक विचार केलेला आहे. आजही शेतकरी शासनाच्या पाठीशी उभा आहे. असे दानवे म्हणाले.

‘तुझ माझ जमेना आणि तुझ्या वाचून करमेना’ अशी परिस्थिती सध्या भाजप आणि शिवसेनेची झाली आहे. अर्थसंकल्पावरील उत्तरातील भाषणात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेना- भाजप एकत्र असून पुढील निवडणूक एकत्रच लढवतील, असे म्हटले होते. त्यातच शुक्रवारी मुख्यमंत्र्यांनीही युतीचे संकेत दिले.