‘आमचे आमदार फुटणार नाहीत, आम्ही त्यांना उदयनराजेंचा फोटो पाठवलायं’

टीम महाराष्ट्र देशा – महाराष्ट्रात सध्या सत्तास्थापनेविषयी गोंधळ सुरु आहे. शिवसेना आणि भाजपमध्ये मुख्यमंत्रीपदाविषयी मतभेद आहेत. त्यामुळे भाजप स्वबळावर सत्ता स्थापन करण्याची शक्यता आहे. त्यासाठी ते विरोधी आमदारांना गळाला लावण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच पक्ष त्यांच्या आमदारांची काळजी घेत आहेत.

विरोधी पक्षातील जेष्ठ नेते आमचे आमदार फुटणार नाहीत असा दावा करत आहेत. याविषयी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मोठे विधान केले आहे. त्यांनी एक ट्वीट केले आहे. त्यात त्यांनी शिवसेना आमदार – रंग शारदा, काँग्रेस आमदार – जयपूर, राष्ट्रवादी आमदार – आप आपल्या घरी कारण सगळ्यांना उदयन राजेंचा फोटो मेसेज करून ठेवलाय हा मेसेज करणाऱ्याला सलाम असं विधान केले आहे.

दरम्यान, आमदार फुटण्याच्या दृष्टीने कॉंग्रेसने आपले आमदार जयपूरला पाठवले आहे. यात ३०-३५ आमदारांचा समावेश आहे. राज्याच्या विविध ठिकाणावरून त्यांना जयपूरला मार्गस्थ केले आहे. त्यात नाना पटोले, विकास ठाकरे, राजू पारवे यांच्यासह इतरांचा समावेश आहे.

दरम्यान, आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यपालाच्या भेटीला गेले होते. ते राज्यभवनावर दाखल झाले होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. भगतसिंह कोश्यारी यांच्या कडे आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे सत्ता कुणाची स्थापन होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.

महत्वाच्या बातम्या