पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत आमचाच महपौर; संजय राऊतांचा विश्वास

पुणे : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे आज पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळा बोलताना त्यांनी पुणे किंवा पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत आमचाच महपौर असेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

आजची महानगरपालिकेतील परिस्थिती उद्याच्या निवडणुकित राहणार नाही. तो एक हवेचा झोका आला आणि गेला. आता पुणे किंवा पिंपरी-चिंचवड महापालिकेतील समीकरणं आणि गणितं संपूर्ण बदलेली असतील. कोणी आमच्या विरुद्ध एकत्र येत असतील तर त्यांचं स्वागत आहे. राजकारणात कोणी एकत्र येत कोणी तुटतात. आम्ही एकत्र लढण्याचा आम्ही प्रयत्न करु. मतांचं विभाजन होणार नाही, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आम्ही जुळवण्याचा प्रयत्न करु पण पुणे किंवा पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत आमचाच महपौर असेल. मी महाविकास आघाडी म्हणालो त्यामध्ये शिवसेनासुद्धा आली. आणि पुण्यासारख्या महापालिकेवर शिवसेनेचा महापौर असावा अशी पुणेकरांची पण इच्छा आहे, असंही राऊतांनी यावेळी सांगितलं.

महाराष्ट्रात सध्या ठाकरे-पवार पॅटर्नचाच बोलबाला आहे. आता पर्यंत देशात, राज्यात पॅटर्न झाले. सध्या प्रत्येवेळी नविन पॅटर्न येतात आणि जातात. पण ठाकरे-पवार पॅटर्न हे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक चलनी पॅटर्न आहे. दोन प्रमुख पक्ष सोबत काँग्रेस सुद्धा आहे. एकत्र आले तर काय होऊ शकतं. कोणत्याही परिस्थितीत मतांचं विभाजन आम्ही होऊ देणार नाही, असंही राऊत म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या