ऐन निवडणुकांच्या तोंडावर आपल्याच माणसाने पक्ष बदलला !- जयंत पाटील

jayant patil ncp

वसई : शिवाजी महाराजांच्या काळातही फितूरी झालीच. आज तीच परिस्थिती निर्माण झाली आहे. ऐन निवडणुकांच्या तोंडावर आपल्याच माणसाने पक्ष बदलला. अशा परिस्थितीतही आपण नजीब मुल्ला यांच्या पाठीशी खंबीर उभे आहोत. नजीब मुल्ला यांचा विजय निश्चित आहे. असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

आज वाशी येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खा शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोकण पदवीधर मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील बोलत होते.

Loading...

राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून भाजपमध्ये आलेले निरंजन डावखरे यांच्या विरोधात खुद्द राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मैदानात उतरले आहेत. विधानपरिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक असून राष्ट्रवादी काँग्रेसने ठाण्याचे नगरसेवक नजीब मुल्ला यांना उमेदवारी दिली आहे.

जयंत पाटील पुढे म्हणाले, ‘साम, दाम, दंड, भेदाचा वापर मुख्यमंत्री करत आहेत. दिसेल त्याला पक्षात प्रवेश दिला जात आहे. जो भाजपमध्ये जात नाही त्याच्या मागे इडीची चौकशी लावली जात आहे. भाजपमध्ये निष्ठावंत कार्यकर्ते दिसत नाहीत. विरोधी पक्ष एकत्र आले तर महाराष्ट्रात परिवर्तन निश्चित घडेल.
पुढच्या निवडणुकांमध्ये काय घडू शकते याची चुणूक कोकण पदवीधर मतदारसंघ कार्यकर्ता मेळाव्याच्या माध्यमातून दिसत आहे. १५ वर्षांच्या काळात आघाडी सरकारने केलेल्या कामांमुळे इथला विकास झाला. त्यामुळे इथला तरुण राष्ट्रवादीच्या विचारांचा आहे, यात दुमत नाही.’ असे त्यांनी स्पष्ट केले.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

वारकरी संतापले ; उद्धव ठाकरे तुम्ही आषाढी एकादशीला शरद पवारांचाच अभिषेक करा
संज्याचं तोंड येरंडेल घेतल्यासारखं झालं असेल : निलेश राणे
दिल्लीत मोठ्या थाटात प्रचाराला गेलेल्या तावडेंना केजारीवालांनी बेक्कार झापलं
मंत्र्यांची तत्परता : वीरपत्नीच्या मदतीला धावले बच्चू कडू...
लोकप्रियतेत ‘तान्हाजी’चाच जयजयकार, अजय देवगन बनला नंबर 1 बॉलीवूड स्टार !!!
शिवसेनेबाबतच्या 'त्या' वक्तव्यामुळे टीकेचे धनी झालेले चव्हाण आता म्हणतात...
राजकीय पक्षांचा कोणताही बंद महाराष्ट्रातील व्यापारी यापुढे पाळणार नाहीत
'शाहीनबाग आंदोलनातील बहुतांश लोक हे पाकिस्तानी आणि बांगलादेशी'
यापेक्षा अधिक लोक तर गुरूद्वारामध्ये रोज लंगरमध्ये जेवतात, तेही मोफत
मशिदींना हात लावल्यास रिपब्लिकन पक्ष मुस्लिमांच्या पाठीशी उभा राहील - रामदास आठवले