मुंबई : आज मुंबईत होत असलेल्या उद्धव ठाकरेंच्या सभेची उत्सुकता राजकीय वर्तुळात लागून राहिली आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून पहिल्यांदाच ते शिवसेना पक्ष प्रमुख म्हणून जाहीर सभा घेत असल्यामुळे या सभेत ते काय बोलणार? याविषयी राजकीय मोठी चर्चा सुरू झाली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सकाळीच माध्यमांशी बोलताना संकेत दिले की, ही ऐतिहासिक सभा होणार असून विरोधकांच्या प्रश्नांना उद्धव ठाकरे सडेतोड प्रत्युत्तर देणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. आता उद्धव ठाकरेंच्या भाषणाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे.
उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे पुढीलप्रमाणे :
-आमच्यासोबत जी गाढवं होती, अगदी घोड्याच्या आवेशात. त्या गाढवाला लाथ मारून आम्ही बाहेर पडलो आहोत.
-आमचे हिंदुत्व म्हणजे देवळात घंटा बडविणारे नाहीतर अतिरेक्यांना तुडविणारे आहे. ज्यांनी घंटा बुडविल्या त्यांना काय मिळालं घंटा? ज्यांना महाराष्ट्र काय आहे हे कळलं नाही त्यांच्यासाठी बोलावे लागत आहे.
– खोटा हिंदुत्वाचा बुरखा घातलेले पक्ष आपल्या सोबत होता. तो देशाची दिशा बदलत आहे.
– एक मे रोजी झालेल्या सभेत देवेंद्र फडणवीस हे चुकून खरे बोललो. मुंबई स्वतंत्र करणार, असल्याचे त्यांच्या मालकांचे म्हणणे असल्याचे ते बोलून गेले. पण तुमच्या 1760 पिढ्या आल्या तरी ती तुम्हाला हिरावून घेता येणार नाही. जो कोणी या मुंबईला वेगळा करायचा प्रयत्न करेल त्याचे तुकडेतुकडे केल्याशिवाय राहणार नाही.
-राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एकदाही देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात उतरलेला नव्हता. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात नव्हता. होता पण जनसंघ म्हणून होता. माझे आजोबा प्रबोधनकार हे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात पहिल्या पाच सेनापतींत होते. मुंबई महाराष्ट्राला मिळालीच पाहिजे, यासाठी लढणाऱ्या संयुक्त महाराष्ट्र समितीतून पहिल्यांदा बाहेर पडला तो जनसंघ. म्हणजे यांचे बाप! मुंबई स्वतंत्र करण्याचा त्यांचा तेव्हापासूनचा प्रयत्न आहे. फडणविसांनी एक मे रोजी घेतलेल्या सभेत ते पोटातले ओठावर आहे.
-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोव्हिडवर बैठक घेतली. पण पंतप्रधानांनी महागाई कमी करण्याचा आम्हाला सल्ला दिला.
-ज्या ज्या वेळेला मुंबईवर आपत्ती येते त्या वेळी शिवसैनिक धावून येतो. स्वतःच्या जिवाची पर्वा न करता तो मदत करतो.
– देवेंद्र फडणवीस तुम्ही बाबरीवर एक पाय टाकला असता, तरी बाबरी पडली असती.
– राज ठाकरे यांना मुन्नाभाईची उपमा. स्वतःला बाळासाहेब समजायला लागलेत.
– उद्या ते उत्तर सभा घेणार आहेत. घ्या. मग आम्ही परवा घेतो. तुम्ही त्याच्यानंतर घ्या. हेच चाळे चालू ठेवायचेत का? उत्तरं द्यायची असतील, तर महागाईने होरपळलेल्या जनतेला उत्तर द्या.
-मग तेव्हा बोंबललात का नाही भोंगा तेव्हा होता ना की मी होतो मी होतो मी होतो. पुन्हा येईन, पुन्हा येईन, पुन्हा येईन. येण्याची शाश्वती नव्हती, गेल्याची पण होती की नाही माहिती नाही.
– संभाजीनगरमध्ये ओवेसी गेला आणि औरंगजेबाच्या थडग्यावर डोकं टेकवून आला. यांची ए टीम, बी टीम, सी टीम काम करतेय. कुणालातरी औरंगजेबाच्या थडग्यावर पाठवायचं, कुणाच्यातरी हातात भोंगा द्यायचा, कुणाच्या हातात हनुमान चालीसा द्यायची आणि मजा घेत बसायचं. म्हणजे काय कारवाई झाली की त्यांच्यावर होणार आणि आम्ही बोंबलायला मोकळे. मग आम्ही जाणार आणि टोमॅटो सॉस लावून पत्रकार परिषद घेणार. हे तुमचं शौर्य.
महत्त्वाच्या बातम्या :